अशीही एक गोष्ट : दुपारी परीक्षा अन् संध्याकाळी लग्नाची बेडी | पुढारी

अशीही एक गोष्ट : दुपारी परीक्षा अन् संध्याकाळी लग्नाची बेडी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आधी परीक्षा अन् नंतर विवाहबंधन करून धायरी येथील राजेश्वरी सतीश चाकणकर यांनी समाजा समोर आगळा आदर्श उभा केला आहे. शालेय जीवनापासून पदवीपर्यंत नेत्रदीपक यश मिळणार्‍या राजेश्वरी यांनी दुपारी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) परीक्षेचा पेपर दिला. त्यानंतर सायंकाळी धायरी येथील शुभम रामदास रायकर यांच्याशी त्यांचे विवाहबंधन झाले. हा सोहळा सोमवारी (दि. 18) पार पडला. त्यानंतर मंगळवारी राजेश्वरी यांनी एमबीएचा दुसरा पेपर दिला.

आजोबा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चाकणकर, चुलते व खडकवासला भाजप ओबीसी आघाडी मोर्चाचे अध्यक्ष अतुल चाकणकर व परिवाराने राजेश्वरी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. परीक्षेचे पेपर देऊन विवाहबंधन करणार्‍या या अनोख्या विवाह सोहळ्याचे परिसरात कौतुक होत आहे.

लग्नाची तारीख अगोदर ठरली होती. नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. राजेश्वरी ‘एमबीए’च्या शेवटच्या वर्षात आहे. त्यामुळे तिने आधी परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि जिद्द व धैर्याने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

-अतुल चाकणकर, राजेश्वरी यांचे चुलते

हेही वाचा

Back to top button