पुणे

Weather Update : बोचरे वारे; आजपासून गारठा आणखी वाढणार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून शहरात दिवसभर बोचरे वारे वाहत आहे. शहराच्या किमान तापमानात फारशी घट नसतानाही नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत. दरम्यान, शनिवारपासून किमान तापमानात घट होऊन गारठा आणखी वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे दक्षिणेत जोरदार पाऊस सुरू आहे. तिकडून बाष्पयुक्त वारे, तर उत्तरेत पश्चिमी चक्रवाताचा कहर सुरू असल्याने काश्मिरात हिमवर्षाव सुरू झाला, तिकडून शीतलहरी येत असल्याने शहरात किमान तापमानाचा पारा 15 अंशांवर असूनही थंडी जाणवत आहे.

सोमवारपासून शहरात पहाटे दाट धुके पडत आहे. दुपारी उन्ह पडले तरी शहर धुक्यात हरवलेले दिसते आहे. बुधवार व गुरुवारी तर दिवसभर दाट धुके अन् गार वारे वाहत असल्याने नागरिकांनी दिवसभर गरम कपड्यांत राहणे पसंत केले. पहाटे बाहेर निघताना स्वेटर, मफलर, टोपी, नाकाला रुमाल बांधून नागरिक व्यायामाला बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र, शहराचे किमान तापमान 15 अंशांवर आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT