पुणे

Weather Report : शहरात दिवसभर गार वारे; ‘या’ तारखेला पावसाचा इशारा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराचे वातावरण सोमवारी अचानक बदलले. कमाल तापमानात 7 अंशांनी घट झाली. शिवाजीनगरचा पारा 38 वरून थेट 31 अंशांवर खाली आला होता. दरम्यान, 30 व 31 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी (दि. 27) शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळी हंगामात सर्वांत कमी नोंदले गेले. गेली अडीच ते तीन महिने शहराचे कमाल तापमान 38 ते 41 अंशांवर होते. मे महिन्यात तर उष्णतेच्या लाटेने कहरच केला. रात्रीच्या तापमानात यंदा मोठी वाढ झाल्याने पुणेकर हैराण झाले होते. सोमवारी दिवस उगवला तो काळ्याभोर आणि दाटलेल्या ढगांनी. शहरावर चारही बाजूंनी काळे ढग दाटून आले होते. त्यात गार वारे सुटल्याने प्रथमच आल्हाददायक वातावरण तयार झाले होते.

शहराचे सोमवारचे तापमान

शिवाजीनगर 31 (25.9), पाषाण 31 (25.5), लोहगाव 29 (26.2), चिंचवड 31 (26.7), लवळे 31(26.1), मगरपट्टा 32 (27.4), एनडीए 31 (26), कोरेगाव पार्क 32 (27.6).

शहरात अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रभाव वाढला. सोमवारी शहरात बाष्पयुक्त वारे धडकले. त्यामुळे ढगाळ वातावरणासह दिवसभर गार वारे सुटल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली.

– डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT