पुणे

Weather Report : शहरात पाऱ्याचा आलेख वाढताच : कोरेगाव पार्क, लवळे 42 अंशांवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कोरेगाव पार्क भागाचा पारा सलग दुसर्‍या दिवशी गुरुवारी 42 अंशांवर स्थिर होता. त्यापाठोपाठ लवळे भागाचा पारा 42 अंशांवर गेल्याने शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता. गेले आठ दिवस शहराचे कमाल तापमान वाढतच आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली, तर शुक्रवारी कोरेगावसह लवळे भागाचा पारा 42 अंशांवर गेला होता.

ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा उष्मा वाढणार

दोनच दिवसांपूर्वी शहरातील ढग गायब झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे. किमान तापमानाचा पारा 27.9 वरून 18 ते 23 अंशांवर खाली आल्याने रात्रीच्या उकाड्यात किंचित दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा 5 एप्रिलपासून शहरात ढगाळ वातवरण राहणार आहे.

गुरुवारीचे शहराचे कमाल तापमान..

कोरेगाव पार्क 42, लवळे 42, शिवाजीनगर 39, पाषाण 39, लोहगाव 40, चिंचवड 40, मगरपट्टा 40, एनडीए 39

हेही वाचा

SCROLL FOR NEXT