202 गावे
1 हजार 249 वाड्या
2 लाख 6 हजार 515 पशुधन
191 खासगी टँकर
22 शासकीय टँकर
Water supply by tanker
पुणे : कडक वाढता उन्हाळा आणि उकाड्याचा पुणे विभागातील चारही जिल्ह्यांना बसला आहे. विभागात 213 टँकरच्या माध्यमातून 1249 वाड्या, 208 गावे, 3 लाख 70 हजार नागरिक आणि 2 लाख 65 हजार जनावरांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे .दरम्यान विभागातील सर्वाधिक बाधित जिल्हा सातारा असून, या भागात माण तालुक्यात 71 हजार 750 नागरिक आणि सुमारे 49 हजार जनावरांना सुमारे 51 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात 41 हजार 450 नागरिकांना 21 टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पुणे विभागात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणविण्यास सुरूवात झाली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर (कोल्हापूर वगळता) या चारही जिल्ह्यात खासगी तसेच शासकीय टँकरच्या माध्यमातून नागरिक, जनावरे यांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात पाण्याच्या टँकरमध्ये चांगलीच वाढ झाली. एप्रिल महिन्यात पुणे विभागासह राज्यात कडक उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढून ते 45 अंशावर पोहचले होते. पुणे विभागातील जिल्ह्यातही उन्हाचा तापमानाचा पारा 42 ते 43 अंशाच्या पुढे गेला होता. त्यामुळे उन्हाच्या झळांमध्ये वाढ झाली. तथापि पाण्याच्या टँकरमध्येही दुप्पटीने वाढ झाली.
मान्सूनचा पाऊस जून ऐवजी जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात सर्वसाधारपणे सुरू होतो. अर्थात पावसाळा सुरू झाला तरी सातारा जिल्ह्यातील माण (दहिवडी ) भागात कायमच पाण्याचे टँकर सुरू ठेवावे लागतात. मात्र, चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी होण्यास सुरूवात होते.
जिल्हा- -वाड्या- - गावे
पुणे - 457 83
सातारा - 438 75
सांगली- 181 25
सोलापूर - 173 25
जिल्हा --- लोकसंख्या
पुणे - 1 लाख 42 हजार 771
सातारा- 1 लाख 855
सांगली -66 हजार 960
सोलापूर - 59 हजार 952