फायटर्स कप 15 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसह उपस्‍थित मान्यवर. Pudhari
पुणे

Warriors Cricket Academy: फायटर्स कप 15 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत वॉरियर्स क्रिकेट अकादमी विजेती

रागिणी चव्हाणच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर प्रसाद ठाकूर क्रिकेट अकादमीवर 19 धावांचा विजय

पुढारी वृत्तसेवा

पुणे : फायटर्स कप 15 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत रागिणी चव्हाण (3-15) हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वॉरियर्स क्रिकेट अकादमी संघाने प्रसाद ठाकूर क्रिकेट अकादमी संघाचा 19 धावांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले.

या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 24.2 षट्कांत सर्वबाद 69 धावांवर संपुष्टात आला. यात श्रद्धा जाधव 10, आर्या शेवाळे 6, वेदिका पाटील 6 यांनी थोडासा प्रतिकार केला. प्रसाद ठाकूर क्रिकेट अकादमी संघाकडून इश्निका निगम (4-17), ओवी गजमल (2-9), ग्रिटी ठोंबरे (2-15), वैष्णवी महाडिक (1-4) यांनी सुरेख गोलंदाजी करत वॉरियर्स संघाला 69 धावांवर रोखले.

69 धावांचे आव्हान प्रसाद ठाकूर क्रिकेट अकादमी संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव 19 षट्कांत सर्वबाद 50 धावांवर कोसळला. यात ग्रिटी ठोंबरे 10, ध्रुवी तिडके 7 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. वॉरियर्स क्रिकेट अकादमी संघाकडून रागिणी चव्हाण (3-15), शरयू (2-2), साक्षी डांगे (2-10), लावण्या मेमाणे (1-9), श्रेया राखोंडे (1-14) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाला 19 धावांनी विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा मा. शोभा पंडित, पराग मोरे, प्रभाकर मोरे, कुशल वाणी (फिजिओ -जयपूर पिंक पँथर्स), निशा मेहता, चंदन गंगावणे, दत्ता वालके व अजय टिंगरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी गुरू विजय दळवी मेहता क्रिकेट समितीचे सदस्य मोहसिन तांबोळी, समीर पटेल, ऋषी दळवी, शफीक जहागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT