Asthma in Pregnancy 
पुणे

पस्तीशीनंतर आई व्हायचंय? हा आहे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

Laxman Dhenge

पुणे : वयाच्या पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना काही बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. वयाच्या पस्तीशीनंतर जोखीम आणि गुंतागुंत स्वाभाविक असली तरी या वयोगटातील अनेक स्त्रियांना निरोगी गर्भधारणा होते आणि त्या निरोगी बाळांना जन्म देतात. गर्भधारणेपूर्वी प्रजनन तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच तपासणी करून घेतल्यास यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढते. महिलांचे वय वाढत असताना प्रजननक्षमता कमी होते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करणे कठीण होते.

35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना तरुण स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आणि प्रजनन उपचारांचा विचार करणे शहाणपणाचे ठरू शकते. वयस्कर महिलांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता सर्वसामान्य महिलांच्या तुलनेने अधिक असते. त्यामुळे कमी वजनाची बाळे जन्माला येतात, तसेच अकाली बाळ जन्मण्याची शक्यता असते, ज्यामुळे बाळाला दीर्घकाळ एनआयसीयूची आवश्यकता भासू शकते, असा सल्ला वंध्यत्वनिवारण तज्ज्ञ डॉ. रूपाली तांबे यांनी दिला आहे.

काय काळजी घ्यावी?

35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बाळाला डाउन सिंड्रोमसारख्या गुणसूत्रांतील विकृती होण्याची शक्यता जास्त असते. या जोखमींविषयी प्रजननतज्ज्ञांशी चर्चा करणे आणि आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना भावनिक आरोग्य महत्त्वाचे ठरते. वाढत्या वयात गर्भधारणेची योजना आखताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. संतुलित आहाराचे सेवन, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणावाचे व्यवस्थापन आणि तंबाखू किंवा अल्कोहोलसारखे हानिकारक पदार्थ टाळणे यांचा समावेश होतो. घटता प्रजननदर आणि वाढत्या आरोग्य धोक्यांमुळे पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT