वानवडी : केदारीनगरमधील प्रितेश मोगरे यांच्या मंडप साहित्य गोडाऊनला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. कोंढवा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वानवडीच्या केदारीनगरमधील प्रितेश मोगरे यांच्या मंडप साहित्य गोडाऊनला मोठी आग लागली होती. यामध्ये मंडपासाठी व शोसाठी बांधण्यात येणारे महागडे कपडे जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोंढवा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, अन्यथा आसपास असणारे बांबू व बैठक व्यवस्थेच्या कापड असलेल्या खुर्च्या व सोपे देखील जळून खाक झाले असते. गोडाऊनला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.
आगीत भस्मसात झालेले किंमती कापड.