पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेची फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. दिल्ली येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
आलोक अजयकुमार पुरोहित (43, रा. एफ-100 मेजर शैतानसिंग कॉलनी, शास्त्रीनगर, जयपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीने विविध विवाह वेबसाईटवर खोट्या ओळखीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
वाकड पोलिस ठाण्यातील पीडित महिलेने 27 सप्टेंबर 2025 रोजी फिर्याद दिली होती. आलोक पुरोहित याने गशर्शींरपीरींहळ. लेा, डहररवळ. लेा आणि खखढचीहरवळ. लेा या विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत पुण्यात येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर आरोपीने फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमक्या देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तक्रार केल्यास फोटो सोशल मीडियावर प्रसारित करीन, अशी धमकी देत आरोपीने तिचा मानसिक छळ केला. पोलिसांनी तत्परता दाखवत 7 ऑक्टोबर रोजी आरोपीस अटक केली.
तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहीत असल्याचे समोर आले असून, तो विविध मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीच्या आधारे महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादीव्यतिरिक्त इतर महिलांनाही आरोपीने अशाच प्रकारे फसविल्याची माहिती समोर आली आहे.