पुणे

वाघोली, खराडीतील होर्डिंग्जचा खर्च वसूल करणार

Laxman Dhenge

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोलीतील सहा व खराडीतील पाच जाहिरात फलकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर कारवाईचा खर्च वसूल करण्यासाठी संबंधित अकरा जाहिरातदारांच्या मिळकतींवर बोजा चढवून महापालिका खर्च वसूल करणार आहे. परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारवाई झाल्यानंतर सदरचा कारवाई खर्च संबंधित अनधिकृत जाहिरात फलक लावणार्‍या संस्था/व्यक्तीकडून वसूल केला जातो. सदरचा निष्कासन कारवाई खर्च जाहिरात फलक लावणार्‍या संस्था/व्यक्तीने विहित मुदतीत न भरल्यास कारवाईचा खर्च संबंधित जाहिरात फलक अभिकरणाकडून वसूल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

जाहिराती लावणार्‍यांमध्ये राजू तामगोले (खराडी), संतोष दरेकर (खराडी), सागर बोराटे/विशाल बोराटे (खराडी), रामदास पठारे (खराडी), लक्ष्मण पठारे/शेखर मते (खराडी), पूजा समीर भाडळे (वाघोली) यांच्याकडून प्रत्येकी 9 लाख 38 हजार, तर संपत गाडे/मनीषा गाडे (वाघोली) यांचे दोन मिळकतप्रमाणे 18 लाख 76 हजार, तर महेंद्र परशुराम भाडळे यांचे तीन मिळकतनुसार 28 लाख 14 हजार अशी एकूण 1 कोटी 3 लाख 18 हजार रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याबरोबर खराडी येथील मे. क्रिशिव पब्लिसिटी तर्फे कौशिक सुनील दत्त यांचे 4 जाहिरात फलक आहेत.

अकरा जागामालकांकडे एक कोटी थकीत

नगर रोड कार्यक्षेत्रात असणारे खराडी, वाघोली भागातील 11 जागा मालकांच्या 11 जाहिरात फलकांचे एकूण शुल्क रक्कम 1 कोटी 3 लाख 18 हजार इतका भरणा संबंधित जाहिरातदार यांनी केलेला नाही. त्यामुळे संबंधितांच्या मिळकतीवर बोजा चढवून रक्कम वसूल केली जाणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT