अखिल भारतीय पोलिस पाईप बँड स्पर्धा; महाराष्ट्र पोलिस दुसर्‍यांदा अव्वल | पुढारी

अखिल भारतीय पोलिस पाईप बँड स्पर्धा; महाराष्ट्र पोलिस दुसर्‍यांदा अव्वल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुजरात गांधीनगर करई येथील पोलिस अ‍ॅकडमी येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस पाईप बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस संघाने दुसर्‍यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी अखिल भारतीय पोलिस पाईप बॅन्ड संघास भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच राज्य राखीव पोलिस बलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक,अशोक मोराळे आदी या वेळी उपस्थित होते.

24 व्या अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेचे गांधीनगर करई येथील पोलिस अ‍ॅकडमी येथे 4 ते 8 डिसेंबरला आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध राज्यांतील पोलिसांचे पाईप बँडचे 13 संघ, ब्रास बँडचे 17 संघ, बिगुलचे 19 व महिला पाईप बँडचे 05 संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य पोलिस बलाचे पाईप बँड, ब्रास बँड आणि बिगुल असे 03 संघ व 84 पोलिस अधिकारी अंमलदारांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये राज्य राखीव पोलिस बलाच्या पाईप बँड संघाने सलग सहावे सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला. तर बेस्ट पाईप बॅन्ड कंडक्टर म्हणून पोलिस हवालदार आर.

अंधारे यांनी ही सुवर्णपदक पटकाविले तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या बिगुल संघानेही सुवर्णपदक पटकाविले आणि महाराष्ट्र पोलिस बलाच्या ब्रास बँड संघाने कांस्यपदक मिळवून महाराष्ट्र राज्य पोलिस दलाने सर्वसाधारण विजेतेपद ही पटकविण्याची किमया केली आहे. महाराष्ट्र पोलिस संघाने नानवीज, दौंड येथील राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्राचे रामचंद्र कैडे यांच्या नेतृत्वाखाली दोन सुवर्ण व एक कांस्य मिळवून सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.

हेही वाचा

Back to top button