तळेगाव ढमढेरे: विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या ग््राामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा शिक्रापूर पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग भिकोबा गवारी, मारुती पांडुरंग गवारी, संगीता दीपक गवारी, सिंधुबाई वसंत गवारी व सुभद्रा पांडुरंग गवारी (सर्व रा. विठ्ठलवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ग््राामपंचायत अधिकारी दत्तात्रय नारायण कुंभार (वय 49, रा. योजनानगर, लोहगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग््राामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत संबंधितांना पूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या. पंचायत समितीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ग््राामपंचायत अधिकारी दत्तात्रय कुंभार, सरपंच शंकर धुळे, ग््राामपंचायत सदस्य सागर ढमढेरे, पोलीस पाटील शरद लोखंडे, कर्मचारी प्रशांत गवारी व अक्षय आल्हाट हे ग््राामस्थ व पोलिसांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते.
यावेळी पांडुरंग गवारी यांच्या घरासमोरील शासकीय जागेतील विटा काढण्यास सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू असताना मारुती गवारी व काही महिलांनी आरडाओरडा करत थेट जेसीबीसमोर बसून कारवाईला विरोध केला. दरम्यान, पांडुरंग गवारी यांनी ग््राामपंचायत अधिकारी कुंभार यांच्यावर धाव घेत त्यांना पकडून धक्काबुक्की केली.
पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संबंधित महिला व व्यक्तींनी अधिकाऱ्यांना व सरपंचास दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत.