मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रविवारी (दि. 31 ऑगस्ट) तरकारी शेतमालाची एकूण 12 हजार 607 डाग इतकी आवक झाली. यामध्ये गवार व शेवगा यांना 10 किलोला 400 ते 750 रुपये, तर वाटाण्याला 900 रुपये बाजारभाव मिळाला. तरकारी आवक वाढल्याने बाजारभावातही वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली. (Latest Pune News)
मंचर बाजार समितीमध्ये तरकारी शेतमालाला 10 किलोसाठी मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कारले 130 ते 240 रुपये, गवार 390 ते 735 रुपये, घेवडा 150 ते 500 रुपये, चवळी 250 ते 460 रुपये, ढोबळी मिरची 230 ते 450 रुपये, भेंडी 260 ते 450 रुपये, फरशी 335 ते 651 रुपये, फ्लॉवर 105 ते 170 रुपये, भुईमूग शेंगा 600 रुपये, दोडका 100 ते 401 रुपये, मिरची 360 ते 650 रुपये, तोंडली 100 ते 411 रुपये, लिंबू 350 रुपये, काकडी 90 ते 170 रुपये, कोबी 10 ते 60 रुपये, वांगी 395 ते 750 रुपये
दुधी भोपळा 150 ते 300 रुपये, बीट 100 ते 245 रुपये, आले 190 ते 550 रुपये, टोमॅटो 240 ते 450 रुपये, मका 80 ते 120 रुपये, पावटा 200 ते 410 रुपये, वालवड 651 ते 831 रुपये, राजमा 200 ते 490 रुपये, शेवगा 300 ते 751 रुपये, वाटाणा 650 ते 900 रुपये, पापडी 700 ते 825 रुपये, आंघोरा 80 ते 150 रुपये, काळा वाल 150 ते 750 रुपये, डांगर भोपळा 70 ते 120 रुपये, गाजर 200 रुपये.
वरीलप्रमाणे विविध शेतमालाला समाधानकारक भाव मिळाल्याचे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.