Attack on Police Pudhari
पुणे

Uruli Kanchan Police Constable Assault: रात्रगस्तीवरील पोलिस हवालदाराला धक्काबुक्की; उरुळी कांचनमध्ये तिघांवर गुन्हा

वर्दीचे बटन तोडले, सरकारी स्कार्पिओच्या आरशाचीही केली तोडफोड; शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: अंधारात संशयास्पदरीत्या थांबलेल्या तीन तरुणांकडे विचारपूस करण्यासाठी गेलेल्या रात्रगस्तीवरील पोलिस हवालदाराला धक्काबुक्की करून त्यांच्या अंगावरील वर्दीचे बटन तोडल्याची घटना समोर आली आहे. यासह सरकारी स्कार्पिओ गाडीची डाव्या बाजूच्या आरशाची काच देखील फोडण्यात आली. याबाबत उरुळी कांचन येथील तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम रवींद्र लोणारी (वय २८, रा. महात्मा गांधी शाळेसमोर, उरुळी कांचन, ता. हवेली), ओंकार राजू वाकचोरे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि धीरज लक्ष्मण नागटिळे (रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष गणपत जाधव (वय ४५) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष जाधव हे मंगळवारी (दि. १३) पहाटे ४ वाजेच्या सुमारास चालक पोलिस हवालदार दाणे आणि होमगार्ड नवनाथ चव्हाण यांच्यासह सरकारी स्कार्पिओ गाडीतून (एमएच १२ झेडसी १३९२) रात्रगस्त घालत होते.

गावातील महात्मा गांधी शाळेच्या गेटसमोर तुपेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंधारात तीन तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाडी जवळ नेऊन त्यांची विचारपूस केली असता धीरज नागटिळे याने अरेरावीची भाषा वापरत पोलिस हवालदार जाधव यांना थेट धक्काबुक्की केली.

या झटापटीत हवालदार जाधव यांच्या शर्टचे वरचे बटन तुटले. एवढ्यावरच न थांबता या तरुणांनी सरकारी स्कार्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या आरशाची तोडफोड करून नुकसान केले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT