Illegal Business Pudhari
पुणे

Illegal Business: उरुळी कांचन परिसरात देहविक्रय व्यवसाय; गावची नावे नाहक बदनाम

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन: उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तथाकथित लॉज व्यावसायिकांकडून सुरू असलेल्या महिला देहविक्रय व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. कथित लॉज व्यावसायिकांकडून खुलेआम हा व्यवसाय सुरू असताना पोलिसांच्या आशीर्वादाने हप्तेखोर वृत्तीला उत्तेजन मिळत असल्याने उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या ‌‘आर्थिक‌’ धोरणाची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या देहविक्रयची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. कथित लॉज व्यावसायिकांनी हा गोरखधंदा सुरू केल्याने हॉटेल व्यावसायिकांना मिळत असलेल्या भरघोस उत्पन्नात पोलिसांनी आपले उत्पन्न वाढविले असल्याची चर्चा आहे.

उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन, सोरतापवाडी या गावांत असा व्यवसाय सुरू झाल्याने ‌‘ना भीती ना संकोच‌’ म्हणून या ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या ग्राहकांचा फेरा वाढला आहे. ग्राहक या ठिकाणी बिनधास्तपणे आपली रासलीला घडवत असून, या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना मोठे उत्पन्न मिळत असल्याची चर्चा आहे.

उरुळी कांचन व सोरतापवाडी परिसरात जिल्ह्यातील वाटसरू तसेच परप्रांतीय नर्सरी खरेदीदारांकडून या ठिकाणी या व्यवसायाला आधार मिळत असल्याने हा व्यवसाय अतिशय जोमाने सुरू असून, ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर हा व्यवसाय सुरू असल्याने या ठिकाणचे नैतिक अधिष्ठान संपुष्टात येत असल्याने ग्रामस्थ अशा प्रकाराने संतप्त झाले आहेत.

ग्रामस्थांकडून तीव शब्दांत संताप व्यक्त

उरुळी कांचन व सोरतापवाडी या ठिकाणी अशा प्रकारे देहविक्रयचा व्यवसाय सुरू असल्याने या प्रकारांनी स्थानिक गावची बदनामी होत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांची कुचंबणा होऊन स्थानिक संस्कृती बिघडू लागल्याने ग््राामस्थ तीव शब्दांत संताप व्यक्त करीत असून, हे प्रकार थांबले नाहीत, तर आंदोलन करण्याच्या भूमिकेत ग्रामस्थ आहेत.

अवैध व्यावसायिकांना राजकीय पाठबळ?

उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील मटका, जुगार व अवैध दारूधंद्याला परवानगी व व्यवस्था करून देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मंडळी अग्रसर असल्याची चर्चा आहे. व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी पडद्याआड ही मंडळी कार्यरत असून, ते या अवैध व्यावसायिकांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT