पुणे

दुर्दैवी ! भिगवण येथे भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Laxman Dhenge

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथील बिल्ट पेपर कंपनीजवळ रविवारी (दि. 26) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
शिवानंद डोणगे (रा. सोलापूर) व अजय अशोक सौदागर (रा. लातूर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. भिगवण पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद व अजय हे दोघे जण मोपेड दुचाकीवरून पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जात होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भिगवण येथील बिल्ट पेपर कंपनीजवळ त्यांना भरधाव वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताची नोंद प्रक्रिया भिगवण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT