Student Admission Warning Pudhari
पुणे

UGC Student Admission Warning: कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी सावधान! यूजीसीचा विद्यार्थ्यांना इशारा; संस्थेची मान्यता तपासण्याचे आवाहन

बनावट विद्यापीठे आणि अनधिकृत अभ्यासक्रमांपासून सावध राहा; जाहिराती, वेबसाईट व सोशल मीडियावरील दाव्यांवर आंधळा विश्वास न ठेवण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी काळजी घ्यावी.

त्यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी त्यांची मान्यता तपासा. अभ्यासक्रम चालवण्याचा अधिकार तपासा, पदवी देण्याची वैधता तपासा आणि मगच प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्देश दिले होते. त्या निर्देशानंतर यूजीसीने हे आवाहन केले आहे. संस्थांच्या दाव्यांची सत्यता तपासल्याशिवाय प्रवेश घेऊ नका.

कोणताही आर्थिक व्यवहार करू नका, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेषतः ऑनलाईन शिक्षण तपासा. दूरस्थ शिक्षण तपासा. ऑफ-कॅम्पस आणि स्टडी सेंटर तपासा. या अभ्यासक्रमांची वैधता तपासणे आवश्यक आहे. संस्थांच्या जाहिराती, वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. माहितीपत्रके आणि सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन यूजीसीने केले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी पडताळणी करावी

विद्यापीठांची अधिकृत यादी यूजीसीच्या वेबसाईटवर आहे. बनावट विद्यापीठांची यादीही तिथेच आहे. वेबसाईट आहे www.ugc.gov.in. विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी या याद्यांची पडताळणी करावी, असे आवाहन आयोगाचे अधिकारी सुदीप सिंह जैन यांनी केले आहे.

कॉलेज अन् विद्यापाठाचे काय तपासावे?

  • ती संस्था कायद्याने स्थापन झाली आहे का?

  • संस्थेला अभ्यासक्रम चालवण्याचा आणि पदवी देण्याचा अधिकार आहे का?

  • यूजीसी आणि इतर सरकारी संस्थांची मान्यता आहे का?

  • तो कोर्स, शिकवण्याची पद्धत आणि केंद्र यांना परवानगी आहे का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT