पुणे

पुणे : वाहनचोरी करणार्‍या अट्ट्ल गुन्हेगारांना बेड्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील विविध भागातून वाहनचोरी करणार्‍या दोघा अट्ट्ल चोरट्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या बुलेट, यामाहा, युनिकॉर्न अशा चार महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमीर अजीज खान (20, रा. धानोरी), व नबील इर्शाद शहा (२०, रा. धानोरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून यामाहा गाडी चोरीला गेली होती. वाहनचोराचा विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाकडून शोध घेण्यात येत होेता. दरम्यान, खान हा धानोरीतील गोकुळनगर मैदानात येणार असल्याची माहिती अंमलदार दिपक चव्हाण, शेखर खराडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून खान व त्याच्या साथीदाराला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी परिसरातून आणखी दुचाकी चोरल्याची कबूली दिली. आरोपी खान याच्याकडून बुलेट, युनिकॉर्न, डिओ, यामाहा अशा चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहु सातपूते, कर्मचारी दिपक चव्हाण, संदीप देवकाते, शेखर खराडे, यशवंत किर्वे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT