पुणे : सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण, मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाहीत. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलने सर्वांना ज्ञात आहेत. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे, असे शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.
महाडमधील आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात टीका सुरू आहे. अंधारे यांनी सोशल मीडियावर आव्हाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. या प्रकरणात आव्हाडांनी माफी मागितली आहे. विरोधक या मुद्द्याचे भांडवल करीत असल्याचा आरोप करीत अंधारे यांनी फटकारले आहे. अंधारे म्हणाल्या, पण तरीही याच्या आडून राजकारण करणार्या लोकांसाठी एक सवाल त्यांनी विचारला की टीकाकारांनी मनुस्मृतीबद्दल आपले मत सांगावे.
हेही वाचा