Shastrinagar Flyover Tree Cutting Pudhari
पुणे

Shastrinagar Flyover Tree Cutting: शास्त्रीनगर उड्डाणपुलासाठी झाडांवर कुऱ्हाड; नागरिकांकडून नाराजी

उड्डाणपुलाच्या कामासाठी 50 हून अधिक झाडांची छाटणी आणि प्रत्यारोपण; नागरिकांनी मागितली पारदर्शकता

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: शास्त्रीनगर चौक परिसरातील पन्नासहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शास्त्रीनगर चौकात प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने पुलाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या पन्नासहून अधिक झाडे काढण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातील तीस झाडांची छाटणी करण्यात येणार आहे, तर तीस झाडांचे प्रत्यारोपण इतर ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. काढण्यात येणारी तीस झाडे कोणत्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नियमाप्रमाणे झाडे लावण्यात यावीत, तसेच संगोपनही होणे गरजेचे आहे. दरवर्षी संगोपनाची माहिती सदर विभागाला देण्यात यावी. तसेच नागरिकांनाही याबद्दल माहिती मिळावी
अजय बल्लाळ, नागरिक, येरवडा
वृक्ष लावण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे
दीपक चव्हाण, अधिकारी, उद्यान विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT