पुणे

Pune Navratri 2023 : पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग…

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत. शहरातील चतुश्रृंगी, भवानीमाता, तांबडी जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असल्याने वाहतूक कोंडी टाळता यावी या उद्देशाने हे बदल केले आहेत.

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने रात्री उशिरा देण्यात आलेल्या या मार्ग बदलांच्या यादीत आप्पा बळवंत चौक, भवानीमाता मंदिर, चतुश्रृंगी मंदिर परिसराचा समावेश आहे. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ताच बंद केला आहे. गाडगीळ पुतळा येथून शिवाजी रस्त्याने इच्छित ठिकाणी लोकांना जाता येईल, रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅन्ड हा भवानीमाता मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. वाहनचालकांनी पंडित नेहरू रोडवरील पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग…

  • आप्पा बळवंत चौक : गाडगीळ पुतळा येथून शिवाजी रोडने पुढे जाता येईल
  • भवानी माता मंदिर : या परिसरातील पार्किंग पूर्ण बंद केले असून, वाहनचालकांनी पंडित नेहरू रोडवरील पार्किंग झोनमध्ये वाहने लावावीत. येथून जाताना एडी कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा, पद‌्मजी चौकातून उजवीकडे वळण घेऊन पुढे जावे.
  • सेव्हन लव्ह चौक : येथून येणारी वाहतूक गोळीबार मैदानाकडे वळविण्यात आली आहे. मालधक्का चौकाकडून येणारी वाहतूक खाणे मारुती चौक अशी सुरू राहील.
  • तांबडी जोगेश्वरी : लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदिराकडे येऊन सेवासदन चौकमार्गे आप्पा बळवंत चौकातून शनिवारवाडामार्गे पुढे जावे.
  • चतुश्रृंगी मंदिर : दर्शनासाठी जाताना गर्दी झाल्यास पत्रकारनगर चौकातून सेनापती बापट रस्ता जंक्शनने सोडण्यात येतील. जास्त गर्दी झाली तर वेताळबाबा चौक ते दीप बंगला चौकमार्गे शिवाजी हाऊसिंग चौकातून उजवीकडे वळून पुढे जाता येईल.

पार्किंगची सोय..

  • टिळक पूल ते भिडे पूलदरम्यानचे नदीपात्र
  • मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन, सतीश मिसाळ वाहनतळ
  • या भागातील पार्किंग झोनमध्ये

हेही वाचा

SCROLL FOR NEXT