पुणे

पिंपरीत ईद-ए-मिलादनिमित्त वाहतुकीत बदल

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त मुस्लिम बांधवांकडून शहरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील वाहतुकीत बदल केले आहेत. शनिवारी (दि. 30) दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल असणार आहेत. चिखली, नेहरूनगर, वाकड, काळेवाडी, भोसरी, निगडी, कासारवाडी येथील वीस मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक झाल्यानंतर पिंपरी येथील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या मैदानात सभा होणार आहे. दरम्यान, वाहतुकीस अडथळा येऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

ईद-ए-मिलादनिमित्त शहरात मिरवणुका आणि सभा होणार आहे. मुस्लिमबांधव दरवर्षी मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलाद साजरी करतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. पिंपरी येथील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या मैदानात सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे सात ते आठ हजार नागरिक येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

असे असतील बदल

  • बंद मार्ग – महावीर चौक चिंचवड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे
  • बंद मार्ग – नाशिक फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीदरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे
  • बंद मार्ग – स्व. इंदिरा गांधी पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – मोरवाडी चौक मार्गे
  • बंद मार्ग – नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – एच ए कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे
  • बंद मार्ग – जय मल्हार खानावळ सम्राट चौक ते मोरवाडी चौक दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – सम्राट चौक ते ऑटो क्लस्टर मार्गे मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौक मार्गे. तसेच जुने मोरवाडी कोर्ट. तसेच केएसबी चौक मार्गे
  • बंद मार्ग – सायन्स पार्क ते मोरवाडी चौक दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – ऑटो क्लस्टर ते मदर तेरेसा ब्रीज मार्गे. मदर तेरेसा ब्रीज, बसवेश्वर चौक मार्गे
  • बंद मार्ग – क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – क्रोमा शोरूम येथून पिंपरी पुलावरून भाटनगरमार्गे
  • बंद मार्ग – पिंपरी चौक ते स्व. इंदिरा गांधी पूल दरम्यानचा मार्ग बंद
    पर्यायी मार्ग – मोरवाडी चौक, पिंपरी पुलावरून भाटनगरमार्गे

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT