बारामती/इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा नजीक चारचाकी गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या बाजूने चालत येत असलेले दशरथ साहेबराव पिसाळ (वय ६२ रा. फोंडवाडा, माळवाडी, तालुका बारामती) व त्याच वेळेस मोरगाव कडून बारामतीकडे टू व्हीलर वर निघालेले अतुल गंगाराम राऊत (वय २२ रा. करावागज ता. बारामती) व त्यांची आई नंदा राउत या तिघांचा मृत्यू झाला. अतुल यांच्या मागे दुचाकी वर बसलेल्या त्यांच्या मातोश्री नंदा राऊत या अपघातात गंभीर जखमी झाल्या झाले होत्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
सदर चारचाकी ही बारामतीहून पुण्याच्या दिशेने निघाली होती तर दुचाकी पुण्याहून बारामतीच्या दिशेला येत होती. फोडवाडा नजीक हा अपघात झाला असून हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. अपघातानंतर चार चाकी वाहन त्याच ठिकाणी होते मात्र चालक त्या ठिकाणी नसल्याने पोलिसांनी चालकांचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
हेही वाचा;