पुणे

विजयस्तंभ अभिवादनासाठी राज्यभरातून हजारो अनुयायी येणार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी 2024 रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (31 डिसेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक एक जानेवारी 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

पुण्याकडून नगरकडे जाणार्‍या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणार्‍या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणार्‍या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणार्‍या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जावे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणार्‍या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT