पुणे

पुणे : कमरेच्या ‘घोड्या’ला पोलीस अधीक्षकांचा लगाम!

अमृता चौगुले

दीपक देशमुख

यवत : पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे करणारांना तसेच पोलिस दलात खाबू गिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्या बरोबरच, केवळ खिशात पैसे आहेत म्हणून कमरेला 'घोडा' लावून फिरण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना लगाम लावण्यात ते यशस्वी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेले जमिनीचे व्यवहार, वाढते नागरिकरण आणि मोठ्या प्रमाणात वाढते औद्योगिकरण यामुळे जिल्ह्यात तरुणांच्या हाती कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा खेळू लागला आहे. आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा लागली असून आलिशान चारचाकी गाडी आणि कमरेला रिव्हॉल्व्हर (घोडा) असेल तर गर्दीचे लक्ष आपण खेचू शकतो अशी भावना गुंठा मंत्री व पैसेवाल्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मात्र जो खरंच बऱ्याच वर्षांपासून जास्त प्रमाणात करदाता आहे, मोठ्या आर्थिक व्यवहारची देवाणघेवाण करावी लागते अशाच लोकांना शस्त्र परवाना मंजूर केला आहे. त्यामुळे केवळ पैसे टाकून चालू काळातील मोठा करदाता होऊन फॅशनसाठी रिव्हॉल्व्हर मिळवणे आणि लोकांच्या नजरेस पडेल अशी पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची हौस असणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

सप्टेंबर 2020 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने नामंजूर केले आहेत. परवानाधारी शस्त्राने अनेकांनी वेगवेगळ्या कारणासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना मध्यंतरी जिल्ह्यात घडलेल्या आहेत अशा घटनांना देखील यामुळे काही प्रमाणात आळा बसला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT