पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्वे रोड, डहाणूकर कॉलनी परिसरातील स्मार्ट कॅफे नावाच्या मोबाईल शॉपीतून चोरट्यांनी 1 लाख 63 हजार रुपयांची रोकड, विविध कंपन्यांचे दोनशे मोबाईल असा 53 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. दुसर्या दिवशी वर्तमानपत्र टाकणार्याने दुकानाचे शटर उचकटलेले पाहिले, तेव्हा चोरी झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी, कोथरूड पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गौरव शिंदे (वय 31,रा. अर्पन बंगलो, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 ते 24 सप्टेंबर या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या कर्वे रोड येथे डहाणूकर कॉलनीत विघ्नहर्ता आणि स्मार्ट कॅफे नावाच्या दोन मोबाईल शॉपी आहेत. त्यातील स्मार्ट कॅफे शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोकड आणि विविध कंपन्यांचे दोनशे मोबाईल असा 53 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. चोरीसाठी चोरटे चारचाकी गाडीतून आले होते. दरम्यान, सकाळी पेपर टाकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने याची माहिती मोबाईल शॉपी मालकांना दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
महापालिकेसमोर बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 4 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस शिपाई ज्ञानेश विष्णू माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल सोमेश्वर कांबळे, किरण चंद्रकांत शिंदे, विशाल दिलीप पवार आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आंदोलनाची परवानगी दिली नसतानासुद्धा बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर भाषणे देण्यात आली. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण झाली. आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी विधी अधिकार्याच्या अभिप्रायानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा