पुणे

जीव व्याकूळला ; मोशीत मोरांची पाण्यासाठी वणवण

backup backup

मोशी : श्रीकांत बोरावके : राष्ट्रीय पक्षी मोराची मोशी (ता. हवेली) भागात सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाण्याअभावी अनेक मोरांनी आदिवास सोडल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे शेती क्षेत्र घटत असताना सिमेंटच्या जंगलात टिकून असलेले मोरांचे अस्तित्वदेखील महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संकटात आले आहे.

आता खडबडून जागे झाले नाही तर येत्या काळात मोर हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेर कुठच्यातरी डोंगरावर कायमचा आदिवास करताना दिसेल, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

इनाम व आल्हाट खोरा, गायकवाड खोरा भागालगत असलेल्या डोंगर टेकडीवर चिंच, कडूलिंब, आवळा, आंबा, पिंपळ आदी इतर वेगवेगळ्या प्रकारची झाडी लावली आहेत.

तेथे एक पाण्याची टाकी आहे व छोटे तळे आहे. परंतु, त्यामध्ये पाणी नसल्यामुळे पक्षांचे पाण्यावाचून हाल होतात. या परिसरात भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तसेच कोकीळा, पोपट, सूतारपक्षी, कुंभार कावळा, कावळा, चिमणी असे अनेक पक्षांचा आदिवास आहे. परंतु, वनीकरणामध्ये गवत वाढल्यामुळे गवतला आग लागून झाडांची नुकसान होत आहे.

वनव्यामध्ये डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले असून जवळपास सर्व झाडे जळून गेली आहेत. यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत असून पाणीसाठे नामशेष झाले आहेत.

पालिकेचे या नैसर्गिक साधन संपत्तीकडे दुर्लक्ष होत असून, मोरांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.याचा विसर पालिकेला पडलेला दिसतो.

कारण या डोंगरावर असलेल्या टाकीत थेंबभर पण पाणी नसून वनव्यामुळे परिसर भकास झाला आहे. एकीकडे उद्यान उभारण्याला प्राधान्य देणार्‍या पालिकेला नैसर्गिक आदिवास दिसत नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मोशी भागातील या नैसर्गिक आदिवासाची जपणूक व्हावी, या ठिकाणी क्षेत्र खासगी वापरास प्रतिबंधित करावे, येथील टाकीत दररोज प्राण्यांसाठी पाणी सोडावे, अशी मागणी निसर्गप्रेमी करत आहेत.

SCROLL FOR NEXT