Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान | पुढारी

Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

मुंबई; पुढारी ऑनलाईन

Maharashtra Budget 2022 : राज्य विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार देण्याची घोषणा केली होती. पण काही आर्थिक अडचणीमुळे हे अनुदान झाले नव्हते. पण या घोषणेची वचनपूर्ती आता केली जात आहे. यामुळे २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी २०२२-२३ या वर्षात १० हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देण्यात येईल. महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देण्यात येईल. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपांना वीज देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.
तसेच हवेली येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी यासाठी २५ कोटींची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

Back to top button