पुणे

पिंपरी : रेशनदुकानांमध्ये काटामारी रोखण्यासाठीच्या उपाययोजना कागदावरच

अमृता चौगुले

नंदकुमार सातुर्डेकर

वजन माप नियंत्रण कायदा असूनही अनेक दुकानदार मापात पाप करतात. यामध्ये शिधावाटप दुकानदारही मागे नाहीत. अनेक शिधावाटप दुकानदार हे रेशन कार्डधारकांची नजर चूकवुन काटा मारतात. मात्र, हे मापात पाप अर्थात काटामारी रोखण्यासाठी केंद्राने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिर्वाय केले आहे. मात्र, पिंपरी चिंचवडपर्यंत अद्याप हा आदेश पोहोचला नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

रेशन घेण्यासाठी लाभार्थ्यांची दुकानात गर्दी होते. तेव्हा घाईगडबडीचा फायदा घेऊन काही रेशनिंग दुकानदार काटा मारतात. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांची दैव देते कर्म नेते अशी अवस्था होते. शासनाने मदतीचा हात पुढे करूनही पुरेशी मदत त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. ही काटामारी रोखण्यासाठी रेशन दुकानांवर इलेकट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिर्वाय करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने रेशन कार्डधारकांना योग्य प्रमाणात अन्नधान्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडणे बंधनकारक केले आहे. रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता आणणे, फसवणूक रोखणे यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, पिंपरी चिंचवड परिमंडळ कार्यालयापर्यंत अद्याप हा आदेश आलेला नसल्याने तोवर काटामारी करणार्‍या रेशनिंग दुकानदारांची चलती तर सर्वसामान्य रेशनिंग कार्डधारकांची फसवणूक होत आहे.

केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेकट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिवार्य केले असल्याबाबत पिंपरी चिंचवड परिमंडळ कार्यालयाकडे अद्याप आदेश आलेला नाही. आदेश आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.
-दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, अ आणि ज विभाग

इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिवार्य
पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 253 रेशनिंग दुकाने आहेत. रेशनिंग कार्डधारक अनेकजण अशिक्षित अथवा कमी शिक्षित आहेत. त्याचा फायदा घेऊन काही रेशनिंग दुकानदार काटा मारू मारतात. केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिर्वाय केले असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास या प्रकारास पायबंद बसेल.

SCROLL FOR NEXT