पुणे

पुणेः वैद्यकीय प्रवेश देण्याचे आमिष पडले महागात

अमृता चौगुले

पुणेः पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका नामांकित रुग्णालयात वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टर व एका महिलेची दोघांनी 32 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ज्ञानेश्वर पाटील (रा. आंबेगाव पठार), स्नेहल पवार (रा. सांगली) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजगुरुनगर येथील 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

ही घटना 14 नोव्हेंबर 2021 ते 5 जून 2022 या कालावधीत घडली. आरोपी पाटील व पवार या दोघांनी संगनमत करून फिर्यादींच्या पाल्याला शहरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीदेखील त्यांच्या आमिषाला बळी पडल्या.

फिर्यादींचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्याकडून 7 लाख पाच हजार रुपये घेतले, तसेच डॉक्टर मेटकरी यांच्याकडून देखील 25 लाख रुपये घेतले. मात्र, त्यांच्या मुलांना तेथे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता.

SCROLL FOR NEXT