पुणे

अबब! गृहप्रकल्प अर्जांच्या छाननीचा खर्च अडीच कोटी

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर), पिंपरी (उद्यमनगर) आणि डुडुळगाव येथे गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. तेथील सदनिकांसाठी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याच्या कामासाठी निविदा न काढता ते काम एका खासगी एजन्सीला थेटपणे बहाल करण्यात आले आहे. या कामासाठी अडीच कोटींचा खर्च आहे.

मोहननगरमधील 6 इमारतींमध्ये 568 सदनिका आहेत. उद्यमनगरमधील 2 इमारतींमध्ये 370 सदनिका आहेत. तर, डुडुळगाव येथील 5 इमारतीमध्ये 1 हजार 190 सदनिका उभारण्यात येणार आहेत. या तीन प्रकल्पांत एकूण 2 हजार 128 सदनिका आहेत. मोहननगर व उद्यमनगर येथील गृहप्रकल्पांसाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. डुडुळगाव गृहप्रकल्पाचे बांधकाम नुकतेच सुरू झाले आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत.

सदनिकांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे, पात्र-अपात्र ठरविणे, सोडत काढणे, सोडत काढल्यानंतर अलॉटमेंट लेटर देणे आदी कामकाज करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी 20 जून 2023 ला मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रिया न राबविता हे काम महापालिकेने थेट पद्धतीने कॅनबेरी अनॉलिटिक्स या खासगी एजन्सीला दिले आहे.

ही एजन्सी पाणीपुरवठा विभागात गेल्या 11 वर्षांपासून पाण्याची बिले वाटपाचे काम करीत आहे. त्यामुळे अर्ज छाननीचे काम त्या एजन्सीला बहाल करण्याचा प्रस्ताव झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. अर्ज छाननीसाठी तब्बल 2 कोटी 37 लाख 50 हजार खर्च येईल, असे एजन्सीने संबंधित विभागास कळविले आहे. त्यानुसार त्या खर्चास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT