निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी जलसंपदावर जनअक्रोश मोर्चा

निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी जलसंपदावर जनअक्रोश मोर्चा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर, राहता, कोपरगाव या तीन तालुक्यातील १८२ गावातील दुष्काळ ग्रस्त भागात पाऊस पडला नसल्यामुळे शेतक ऱ्यांना शेतीचे पाणी सोडाच, परंतु पिण्याचे पाणी सुद्धा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे निळवंडे डाव्या कालव्याला जल संपदा विभागाने लवकरात लवकर पाणी सोडावे या मागणीसाठी संगमनेर मधील घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चात संगमनेर, कोपरगाव, राहता या दुष्काळी पट्ट्यातील १८२ गावातील शेतकरी या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सर्व शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर भर उन्हात बसले आहेत.  सध्या दुष्काळी भागात शेतीच्या पाण्याची सोडाच तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा जलसंपदा विभागाने जरूर विचार करावा अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्याशेतकर्यांनी लावून धरली आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी निळवंडेच्या डाव्या पाटाला पाणी सुटलेच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news