पुणे

Accident : टेम्पो-पिकअपची समोरसमोर धडक; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

backup backup

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : भरधाव टेम्पो आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर, दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. २८) रात्री ११ वाजेच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील आळे गावच्या हद्दीत घडला.

राजुरीकडून टेम्पो (MH 42 AQ 3636) हा आळेफाट्याकडे भरधाव वेगाने निघाला होता. तर आळेफाट्याकडून पिकअप (MH 14 DM 8911) राजुरीकडे निघाला होता. दोन्ही वाहने आळेगावच्या हद्दीतील आकाश गंगा सोसायटीसमोर येताच जबर धडक झाली.

या भयानक अपघातात पिकअप चालक राजकुमार गोपीनाथ हाडवळे (वय-41, रा. राजुरी) याचा जागीच मृत्यू झाला. पिकअप मधील कैवल्य प्रकाश औटी (वय- 15, रा. राजुरी) आणि आयशर टेम्पोमधील ऋषिकेश अनंता पायगुडे (रा. केडगाव चौफुला, ता. दौंड) गंभीर जखमी झाले.

जखमींवर आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आळेफाटा पोलिसांनी आयशर टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT