पुणे

सांगा, आम्ही मध्यरात्री घरी कसे पोहचायचे?

backup backup

खोदकाम, कोंडीमुळे नागरिक हैराण

दापोडी : पुढारी वृत्तसेवा :

परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामानिमित्त ड्रेनेजलाइन व काँक्रीट परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामानिमित्त ड्रेनेजलाइन व काँक्रीट रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ही कामे पावसामुळे संथगतीने सुरू आहेत. रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ही कामे पावसामुळे संथगतीने सुरू आहेत.

रात्रीच्या वेळी एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत ताटकळत थांबावे लागत आहे. मागील दोन-तीन दिवसांत खोदकामांमुळे चिखलमय रस्त्यावर बारा दुचाकींचे किरकोळ अपघात झाले आहेत.

दापोडीतील शितळादेवी चौक ते त्रिमूर्ती चौक पिंपळे गुरव या रस्त्यावर ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच, सिमेंट काँक्रीट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे.

मात्र, या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा सूचना फलक न लावल्यामुळे वाहन चालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. दिसेल त्या वाटेने प्रत्येक वाहनचालक आपले वाहन दामटतात. त्यातच टवाळखोरांची घुसखोरी सुरुच असते.

दापोडी आणि पिंपळे गुरवला जोडणार्‍या पुलावर एकेरी वाहतूक असल्यामुळे अवजड वाहने व लक्झरी बसेस तसेच दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे.

दापोडीहून पिंपळे गुरवला पर्यायी रस्ता नसल्याने या रस्तावर संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहनांची तुडुंब गर्दी असते. त्यामुळे कामगार वर्गाला घरी पोहोचण्यासाठी रात्री मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागते. या प्रवासात जीव मेटीकुटीला येतो.

तारेवरची कसरत करत नागरिकांना घरी पोहोचावे लागत आहे. ऑफिसमधून सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी रस्त्यात दोन ते तीन तास ताटकळत थांबावे लागते.

प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असल्यामुळे ते वेढीवाकडी वाहने चालवून वाहतूककोंडीत भर टाकण्याचे काम करतो. दिवसभर ऑफिसचा थकवा आणि वाहतूककोंडीचा त्रास सहन केल्यानंतर स्वंयपाक कधी करायचा? आराम कधी करायचा?

असा प्रश्न परिसरातील महिलांना पडला आहे, असे दापोडीतील शोभा कांबळे यांनी सांगितले.

त्रिमुर्ती चौकात ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी जेसबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. हे खोदकाम करत असताना पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे चिखलमय पाणी उपसून रस्त्यावर टाकले जाते.

येणार्‍या जाणार्‍या वाहनांमुळे रस्त्यावर चिखल पसरला आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी सहा ते आकरा वाजण्याच्या दरम्यान बारा दुचकीचे घसरुन अपघात झाले आहेत. यामुळे वाहन चालकांच्या हाताला पायाला किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

एकीकडे स्मार्ट सिटीचे कामे होत असताना दुसरीकडे नागरिक व वाहनचालकांची तारांबळ होत आहे. या गोष्टीकडे प्रशासनाची जाणून-बजून डोळेझाक होत आहे.

किमान प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावून दिशादर्शक फलक दर्शनीय ठिकाणी उभे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

SCROLL FOR NEXT