तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजार स्थलांतरित करण्याच्या हालचाली ग््राामपंचायत प्रशासनाने सुरू केल्यानंतर व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला स्थानिक व्यापारी व दुकानदारांनी कडाडून विरोध दर्शविला.
परिणामी, तूर्तास आठवडा बाजार स्थलांतरास स्थगिती देण्यात आली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ग््राामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी दिली. तसेच रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी (दि. 17) तळेगाव ढमढेरे ग््राामपंचायत कार्यालयाच्या आवारात अचानक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या निर्णयास अंतर्गत बाजारपेठेतील स्थानिक दुकानदार व व्यापारी वर्गाने तीव विरोध केला. व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ग््राामपंचायत प्रशासनाने तात्पुरता आठवडा बाजार ’जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
या वेळी बाजारतळ परिसरातील संरक्षण भिंत पाडून नदीकडील बाजूस अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस सरपंच रोहिणी तोडकर, ग््राामविकास अधिकारी सात्रस, माजी उपसभापती अनिल भुजबळ, ॲड. सुधीर ढमढेरे, उपसरपंच गोविंद ढमढेरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर रासकर, माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, शेतकरी संघटनेचे सुनील ढमढेरे, ॲड. सुदर्शन तोडकर, भरत भुजबळ, संतोष भुकणे, भगवान खुरपे, विलास खुरपे, धनंजय नरके आदी उपस्थित होते.
आठवडा बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी तेथे विक्री करू नये. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ग््राामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले.