PMPML Pudhari
पुणे

Swargate PMPML Bus Stand: स्वारगेट पीएमपी बसस्थानक डिसेंबरअखेर प्रवाशांच्या सेवेत; अत्याधुनिक सुविधांनी होणार सज्ज

महामेट्रोच्या कामामुळे पाडलेल्या स्थानकाची पुनर्बांधणी अंतिम टप्प्यात; ऊन-पावसापासून प्रवाशांना मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महामेट्रोच्या कामामुळे पाडण्यात आलेले स्वारगेट येथील पीएमपीचे बसस्थानक आता पुनरउभारणीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरअखेर हे नवीन आणि अत्याधुनिक बसस्थानक पीएमपी प्रशासनाकडे हस्तांतरित केले जाणार असून, त्यानंतर तिथून बस संचलन पूर्ववत सुरू होईल.

यामुळे गेल्या काही काळापासून ऊन, वारा, पाऊस आणि सुविधांच्या अभावामुळे हाल सोसणाऱ्या हजारो प्रवाशांना व पीएमपी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्वारगेट हे पुण्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. नव्या स्थानकामुळे प्रवाशांना आडोसा मिळण्यासोबतच पिण्याचे पाणी, बसची वाट पाहण्यासाठी बैठक व्यवस्था आणि उत्तम स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांची गैरसोय दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे. पीएमपीच्या स्वारगेट येथील नवीन बसस्थानकाचे काम वेगाने पूर्ण केले जात असून, डिसेंबरअखेर हे आधुनिक स्थानक पीएमपी प्रशासनाकडे सुपूर्द केले जाईल. त्यामुळे प्रवाशांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त असा सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल.
चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT