Pune Road Potholes: पुण्यात खड्डेदुरुस्तीच्या नावाखाली ‘मलमपट्टी’; कोट्यवधींचा खर्च, तरी खड्डे कायम

महापालिकेच्या आकडेवारीत २७ हजारांहून अधिक चौ.मी. पॅचवर्क; नागरिकांचा सवाल—‘बुजवलेले खड्डे किती दिवस टिकले?’
Pune Road Potholes
Pune Road PotholesPudhari
Published on
Updated on

पुणे: खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च, डांबरीकरणाच्या निविदांवर कोट्यवधींची उधळण आणि खड्डे दुरुस्त केल्याचे महापालिका प्रशासन रोज नवे दावे करत असले तरी, तरीही पुणेकरांच्या वाट्याला मात्र रोज नवे खड्डे येताहेत. शहरात खड्डेदुरुस्तीच्या नावाखाली बोगस दुरुस्ती केली जात आहे. ठेकेदार कागदोपत्री खड्डे बुजवल्याचे दाखवत आहे. जे खड्डे कोल्ड मिक्स व डांबर टाकून बुजवण्यात येत आहेत, ते देखील निकृष्ट पद्धतीने केले जात आहेत. रस्त्यावरील माती-खडी साफ न करताच डांबराचा मुलामा देणे, खड्ड्यांत माती-मुरूम कोंबणे आणि निकृष्ट पद्धतीने पॅचवर्क करून काम उरकणे, यामुळे शहरातील रस्ते जीवघेणे झाले आहेत.

Pune Road Potholes
Swargate Katraj Metro: स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या भुयारी कामाला वेग; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन टीबीएम पुण्यात दाखल होणार

महापालिकेच्या पथ विभागाने ७ जुलै ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. या आकडेवारीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोल्ड मिक्सद्वारे ३,६८२ चौ.मी., हॉटमिक्स प्लांटद्वारे २०,५६७ चौ.मी. पॅचवर्क करण्यात आले आहे. तसेच मुरूम, जीएसबी आदी साहित्य वापरून २,८१२ चौ.मी. क्षेत्रावर सर्फेसिंग करण्यात आल्याची नोंद आहे. पेव्हिंग ब्लॉक वापरून १४९ चौ.मी. क्षेत्रातील खड्डे-दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केल्याची कागदोपत्री आकडेवारी असूनही शहरातील खड्ड्यांची समस्या संपलेली नाही. उलट अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याऐवजी त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत आहेत. काही ठिकाणी माती आणि मुरूम टाकून खड्डे बुजवले जात असल्याने पावसाचे पाणी साचल्यानंतर ही भरावाची कामे वाहून जाण्याचा धोका निर्माण होतो.

Pune Road Potholes
Pune Women Safety Public Toilets: पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; महिलांची सुरक्षा ‘रामभरोसे’

महापालिकेच्या आकडेवारीतच हॉटमिक्सद्वारे मोठ्या प्रमाणावर पॅचवर्क झाल्याचे दिसते. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात ३,३६१ चौ.मी., धनकवडी-आंबेगाव-कात्रजमध्ये २,०३० चौ.मी., सिंहगड रस्त्यावर ३,०८२ चौ.मी., तर येरवडा-वडगाव शेरीमध्ये १,२०२ चौ.मी. हॉटमिक्स पॅचवर्कची नोंद आहे. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने सात क्षेत्रीय कार्यालयांसाठी नव्याने निविदा काढल्या असल्या, तरी प्रत्यक्षात खड्ड्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे निविदा, दुरुस्ती आणि खर्च यापेक्षा कामाची गुणवत्ता तपासणार कोण, हा खरा प्रश्न आहे. दरवर्षी रस्तेदुरुस्ती, डांबरीकरण आणि पॅचवर्कच्या नावाखाली मोठा निधी खर्च होतो. मात्र, त्यानंतरही खड्डे कायम राहत असतील तर केवळ आकडेवारी सांगून प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही. खड्डा बुजवला की काम संपले, अशी मानसिकता बदलून केलेल्या कामाची टिकाऊपणा तपासणी आणि संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा पुणेकरांच्या करातून होणारा खर्च आणि त्यांच्या जीवाशी खेळ, हे चक्र असेच सुरू राहणार आहे.

Pune Road Potholes
Pune Traffic Congestion: पुण्यात वाहतूक कोंडीवर ‘कारवाई’पेक्षा नियमनावर भर; दिवाळीपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी

आकडे काय सांगतात?

७ जुलै ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील पथ विभागाची नोंद

• कोल्डमिक्स पॅचवर्क : ३,६८२ चौ.मी.

• हॉटमिक्स प्लांट पॅचवर्क : २०,५६७ चौ.मी.

• मुरूम, जीएसबी आदी साहित्याने सर्फेसिंग : २,८१२ चौ.मी.

• पेव्हिंग ब्लॉकद्वारे खड्डे-दुरुस्ती : १४९ चौ.मी.

खड्डे बुजले की पुन्हा उखडले?

महापालिकेच्या नोंदीत मोठ्या प्रमाणावर पॅचवर्क झाल्याचे दिसत असले, तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे 'किती खड्डे बुजविले?' यापेक्षा 'बुजविलेले खड्डे किती दिवस टिकले?' याचे उत्तर प्रशासनाने पुणेकरांना द्यावे, अशी मागणी होत आहे.

Pune Road Potholes
MBBS BDS Admission 2026: MBBS-BDS प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; हरकतीसाठी आज शेवटची संधी

रोडमित्र ॲपवर तक्रार नोंदवूनही दखल नाही

महापालिकेने नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रोडमित्र ॲप तयार केले. मात्र, हे ॲप व्यवस्थित काम करत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी सोडवल्या जात नाहीत. बरेच वेळा खड्ड्यांचे फोटो टाकून देखील त्यांची दुरुस्ती झाली, अशी माहिती दाखवून तक्रार बाजूला केली जाते.

सूस परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यांची आम्ही तक्रार केली. काही खड्डे फक्त मुरूम, खाडी व माती टाकून बुजवले आहेत. यामुळे खडी रस्त्यावर येऊन दुचाकी घसरून अपघात होत आहेत, तर मातीमुळे रस्त्यावर चिखल होत आहे. आमच्या त्रासाची दाखल ना महापालिका घेत आहे ना लोकप्रतिनिधी.

प्रदीप नेहे, नागरिक, सूस गाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news