Tukaram Karande Death: राष्ट्रीय खो-खोपटू तुकाराम करांडेची पुण्यात आत्महत्या; पिस्तूल प्रकरणानंतर नैराश्यात असल्याची माहिती

गुलटेकडीतील मित्रांच्या खोलीत घेतला गळफास; आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
Suicide Attempt
Suicide AttemptPudhari
Published on
Updated on

पुणे: बीडमधील राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे (वय २८) याने पुण्यातील गुलटेकडी परिसरात मंगळवारी रात्री ८च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम काही दिवसांपासून मित्रांसोबत गुलटेकडी येथे राहत होता.

Suicide Attempt
Pune Road Potholes: पुण्यात खड्डेदुरुस्तीच्या नावाखाली ‘मलमपट्टी’; कोट्यवधींचा खर्च, तरी खड्डे कायम

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी बीड पोलिसांनी तुकारामला देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Suicide Attempt
Swargate Katraj Metro: स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या भुयारी कामाला वेग; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन टीबीएम पुण्यात दाखल होणार

तुकाराम हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील मूळ रहिवासी असून, सध्या बीड शहरातील स्वराज्यनगर येथे राहत होता. त्याने राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मंगळवारी रात्री तुकारामचे मित्र कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने खोलीत गळफास घेतला.

Suicide Attempt
Pune Women Safety Public Toilets: पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; महिलांची सुरक्षा ‘रामभरोसे’

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

Suicide Attempt
Pune Traffic Congestion: पुण्यात वाहतूक कोंडीवर ‘कारवाई’पेक्षा नियमनावर भर; दिवाळीपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तुकाराम करांडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर तुकाराम नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो पुण्यात आला आणि गुलटेकडी परिसरात मित्रांसोबत राहत होता. त्याच काळात त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news