जळोची/काटेवाडी : दै. ‘पुढारी’ म्हणजे निष्पक्ष, निर्भीड, चौफेर बातम्यांचा खजाना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, खेळ व इतर सर्व विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणि सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.(Latest Pune News)
बारामतीतील सहयोग येथील निवासस्थानी शनिवारी (दि. 18) खा. सुनेत्रा पवार वाढदिवसानिमित्त काढलेल्या तालुका पुरवणीच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी सुभाष सोमाणी, संजय भोसले, व्हीआर बॉयलरचे चेअरमन राजाराम सातपुते, संचालक विवेक सातपुते, उद्योजक राहुल वायसे, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी माने, हॉटेल राजवाडा पार्कचे आनंद सावंत, अधिराज लॉन्सचे विशाल बर्गे, संदीप फर्निचरचे संदीप पवार, पोपटराव पवार, उद्योजक शिवाजीराव काळे, छत्रपती कारखान्याचे संचालक अनिल काटे, राहुल घुले, संजय काटे, दिलीप बलवड, रोहन हगवणे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संरपच मंदाकिनी भिसे, उद्योजक विद्याधर काटे, श्रीधर घुले, भारत जाधव, श्रीजित पवार, पोपट घुले, धीरज घुले, जितेंद्र काटे, अक्षय पवार,
दै. ‘पुढारी’चे पत्रकार गजानन हगवणे, पत्रकार अनिल सावळे पाटील आदींची उपस्थिती होती. दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक कै. पद्मश्री ग. गो. जाधव यांनी कोल्हापूरपासून सुरुवात करून दिली. आज महाराष्ट्र, कर्नाटक गोवा व इतर ठिकाणी दै. ‘पुढारी’ने कौतुकास्पद कामगिरी करून पत्रकारितेमधील आदर्श निर्माण केल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व समूह संपादक योगेश जाधव यांनी काश्मीरमधील बर्फमय प्रदेशात भारतीय सैन्यासाठी बांधलेले रुग्णालय, पूरग््रास्तांना मदत व इतर सामाजिक कार्याचे कौतुक पवार यांनी केले. खा. सुनेत्रा पवार म्हणाल्या, दै. ‘पुढारी’ वृत्तपत्राने नेहमीच समाजातील सकारात्मकतेला वाव दिला आहे. ‘वाढदिवस शुभेच्छा पुरवणी’ हा उपक्रम वाचकांना त्यांच्या प्रियजनांशी भावनिक नाते जपण्याची संधी देतो.
आजच्या डिजिटल युगात देखील वृत्तपत्र माध्यम माणुसकी आणि संवादाचे बंध घट्ट करणारे आहे. वाचकांच्या भावना जपणारे वृत्तपत्र म्हणून दै. ‘पुढारी’ आपली ओळख अधिक मजबूत करीत असल्याचे खा. पवार म्हणाल्या.