सुजय विखेंनी जाहीर माफी मागावी; प्रदेश सरचिटणीस सुरवसे पाटील यांची मागणी Pudhari
पुणे

सुजय विखेंनी जाहीर माफी मागावी; प्रदेश सरचिटणीस सुरवसे पाटील यांची मागणी

राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: महायुतीच्या प्रचारार्थ माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर येथे आयोजित केलेल्या सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आम्ही देशमुख यांचा निषेध करत असून, सुजय विखे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून तमाम महिला भगिनींचा अपमान केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असणार्‍या भाजप पदाधिकार्‍यांनी, तसेच सुजय विखे यांनी हे भाषण थांबवायला हवे होते. मात्र, त्यांनी आक्षेपही घेतला नाही आणि देशमुख यांचे भाषणही थांबवले नाही.

नेत्यांच्या विखारी वक्तव्यातून ‘बेटी बचाव’ आणि ‘लाडकी बहीण’चा नारा देणार्‍या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. संगमनेरमधील सभेतून भाजपची आणि विखे कुटुंबाची महिलांबाबत असणारी वृत्ती आणि संस्कृती दिसून आली आहे. हीच का ‘पार्टी विथ डिफरन्स’ असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT