रायगड : महायुतीतीत 8 ते 10 जागांचा विषय शिल्लक आहे. 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे व आपण एकत्र बसून ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमजातून महायुतीच्या पक्षांतील इच्छुकांकडून अर्ज दाखल झालेले असतील, त्या सर्वांशी संपर्क करून त्यांना योग्य ती भूमिका समजून सांगण्याच प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी येथे दिली.
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खा. तटकरे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. तटकरे म्हणाले, येथे सर्व ताकदीनिशी महायुती दळवी यांच्या पाठी उभी आहे. लोकसभा निवडणुकी वेळी आपल्याला तितके मताधिक्य मिळाले होते, त्यापेक्षा अधिक मताधिक्य दळवी यांना मिळेल. राज्यात काही ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी होत आहे, यावर खा. तटकरे म्हणाले, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्व 288 मतदारसंघात काय स्थिती आहे, याचा माहिती घेण्यात येईल. 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे व आपण एकत्र बसून ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमजातून महायुतीतील पक्षांतील इच्छुकांकडून अर्ज दाखल झालेले असतील, त्या सर्वांशी संपर्क करून त्यांना योग्य ती भूमिका समजून सांगण्याच प्रयत्न करण्यात येईल.
काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित होत नाहीत. यावर भाष्य करताना खा. तटकरे म्हणाले, दसर्याच्या आधीपासूनच आघाडीतर्फे उमेदवार निश्तिच झाले आहेत, असे सांगितले जात होते, त्यामुळे आघाडीचा दावा किती फोल होता हे आता सिद्ध झाले आहे. महायुतीचा 8-10 जागांचा विषय शिल्लक आहे. असे ते म्हणाले.आले आहे.