पुणे : पुढारी वृत्तसेवा : देवाची उरुळीतील कचरा डेपोत जुन्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचे (बायोमायनिंग) काम पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवा, अशा सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केल्या आहेत. या वेळी आयुक्तांनी कचरा डेपोमध्ये कचर्याचे 'सायंटिफिक लँडफिलिंग' व्यवस्थित झाले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी मंगळवारी देवाची उरुळी, फुरसुंगीतील कचरा डेपोला भेट देऊन आढावा घेतला.
या ठिकाणी साधारण 35 लाख टनाहून अधिक कचरा असून 20 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली आहे. अद्यापही 9 ते 10 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे बाकी आहे. परंतु, पूर्वीची निविदा संपल्याने महिनाभरापूर्वी हे काम बंद आहे. घनकचरा विभागाने अडीच लाख टन कचऱ्यासाठीच निविदा काढण्याची तयारी केली होती. मात्र, आयुक्तांनी वस्तुस्थिती पाहिल्यानंतर 9 ते 10 लाख टन कचऱ्यासाठी निविदा काढण्याचे आदेश दिले.
हेही वाचा