पुणे: एका टेलिग््रााम ग््रुापवर दहावीच्या गणित तसेच विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. हव्या असतील तर पैसे भरा, अशाप्रकारे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात पेपर दिले गेले नाहीत. त्यामुळे गणित तसेच विज्ञानाचा पेपर फुटलाच नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टेलिग््रााम ग््रुापवर 9 मार्चला सायंकाळी 5.47 वाजता विज्ञान भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा मेसेज प्रसारित करण्यात आला. यादरम्यान प्राप्त तक्रारींच्या आधारे तत्काळ त्याच दिवशी पुणे विभागीय मंडळामार्फत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर संबंधित पडताळणी करावी, या उद्देशाने 10 मार्चला विभागीय मंडळ व पोलिस विभागाकडून संबंधित ॲडमिनला 11 मार्चला होणाऱ्या विज्ञान भाग एकचा पेपर उपलब्ध करून देण्यासाठी मेसेज करून मागणी केलेली रक्कम 600 रुपये देण्यात आली.
परंतु, ग््रुाप ॲडमिनने विज्ञानाचा पेपर सुरू होईपर्यंत पेपर उपलब्ध करून दिलेला नाही. याबाबत पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे. त्यामुळे टेलिग््रााम ग््रुापवर गणित भाग - 2 व विज्ञान भाग - 1 या विषयांचा पेपर सुरू होण्यापूर्वी उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. गणित भाग-2 चा पेपर हा त्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ग््रुापवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. याचा अर्थ राज्य मंडळाचा कोणताही पेपर त्या दिवशीचा पेपर सुरू होण्यापूर्वी संबंधित ग््रुापवर उपलब्ध झालेला नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित प्रकरणात अज्ञाताने टेलिग््रााम ग््रुाप तयार करून त्यामध्ये पेपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश सकृतदर्शनी दिसून येते. संबंधित टेलिग््रााम ग््रुापवर पेपरपूर्वी पेपर उपलब्ध करून दिला जाईल, असा मेसेज प्रसारित करण्यात येतो. परंतु, प्रत्यक्ष पेपर उपलब्ध करून न देता वैयक्तिक मेसेज करून व मागणी केलेली रक्कम भरून पेपर उपलब्ध करून घ्यावा, असे सांगण्यात येते.
म्हणजेच, सकृत्दर्शनी केवळ आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे दिसून येते. गणित भाग-2 विषयाचा पेपर त्या दिवशी पेपर संपल्यानंतर ग््रुापवर पूर्वी दिलेल्या लिंकमध्ये उपलब्ध करून दिला आहे. यावरून बोर्डाचा गणित भाग-2 चा पेपर सुरू होण्यापूर्वी टेलिग््रााम ग््रुापवर उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. तसेही गणित भाग-1 गणित भाग-2 ची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रसारित झाल्याची कोणतीही तक्रार अद्याप या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पेपर फुटले, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.