पुणे : पुणे येथील स्क्वाड्रन लीडर प्रथमेश दत्तात्रेय डोंगरे या तरुण अधिकाऱ्याला वायुसेना पदक या वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असाधारण धैर्य, तत्काळ निर्णयक्षमता व कौशल्यपूर्ण विमान संचालनाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Latest Pune News)
भारतीय वायुसेनेचा 93 वा वर्धाप दिन 8 ऑक्टोबर रोजी गाझियाबाद येथील हिंडन एअर बेसवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुख्य पाहुणे म्हणून संरक्षणदल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख, तसेच हवाईदल प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी वायुसेनेच्या उत्थानपटाचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक स्तरावर वाढलेली ताकद अधोरेखित केली. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल वायुसेनेच्या क्षमता आणि धाडसी कारवाईचं कौतुक केले. या वेळी त्यांनी सन्मान समारोहात वायुसेनेच्या जवानांना 97 पदके आणि 6 युनिट सिटेशन्स बहाल केले.
सहकुटुंब राष्ट्रपतींसमवेत भोजनाचा मान अत्यंत संकटातही केलेल्या धाडसी आणि अचूक निर्णयासाठी, भारतीय वायुसेनेचे मानदंड प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित वायुसेना पदक मिळवणाऱ्या प्रथमेशला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहकुटुंब भोजनाचे आमंत्रण दिले, त्या प्रसंगाने आई-वडील भारावून गेले.
पुणे शहरातील रहिवासी भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर प्रथमेश डोंगरे याला वीरता पुरस्कार प्रदान करताना हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग.