धायरी: पुढारी वृत्तसेवा : संपुर्ण देशात अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या नवले पुल परिसरात पुन्हा भरधाव ट्रकने चौकात सिग्नलला थांबलेल्या आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. ही घटना शनिवार दि. २४ रोजी सकाळी अकरा वाजनेचे सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
या अपघातात कार, टेम्पो, रिक्षा इत्यादी वाहनांचा समावेश असुन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभय, वाहतुक शाखेचे उपनिरीक्षक अविनाश ढमे, अस्मिता लाड, अक्षय पाटील हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी झालेली वाहतुक कोंडी सुरळीत केली.
हेही वाचा