पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र, कचरा स्थानांतरण केंद्र तसेच, भोसरी तलाव उद्यान आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली. ही सर्व कामे जलदगतीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केली.
कासारवाडी आणि गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्रास भेट दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत कासारवाडी आणि गवळीमाथा येथील घरघुती घातक कचरा प्रक्रियेसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रक्रिया केंद्र आणि अमृत 2.0 या उपक्रमातंर्गत भोसरी मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणीचा आढावा घेतला. तेथील बांधकाम प्रक्रियेची माहिती घेतली.
चिखली तसेच जाधववाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्राच्या पाहणीत तेथील स्काडा तंत्रज्ञानाबाबतची माहिती घेतली.या वेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, अनिल भालसाखळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उपअभियंता योगेश आल्हाट, सोहन निकम, राजेंद्र मोराणकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा