पुणे

सोमनाथ निवृत्ती गिते यांना विश्वकर्मा विद्यापीठाची डॉक्टरेट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून सोमनाथ निवृत्ती गिते यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी (Doctorate in de-addiction study and innovation) प्रदान करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीचा सखोल अभ्यास करून त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचे काम त्यांनी केले. अनेकांचे समुपदेशन, तसेच सातत्याने लिखाण करून उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

गेल्या १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी गिते यांनी सातत्याने लिखाण करत उल्लेखनीय काम केले आहे. आपल्या अभ्यासाचा समाजाला काय आणि कसा फायदा होईल, यादृष्टीने विचार करून ते नेहमी कार्यरत असतात. व्यसनमुक्तीवरील त्यांचे विविध लेख दैनिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना डॉक्टरेट पदवी पूर्ण करण्यामध्ये डॉ. ललिता बोरा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

समुपदेशन, वर्तमानपत्रे, मासिके, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 'व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२', तसेच व्यसनमुक्ती परिषदेचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२' त्यांना मिळाला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT