Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

Someshwar Election: 'सोमेश्वर'मध्ये शेतकरी कृती समिती ताकद आजमावणार, सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? मंगळवारी निर्णय घेणार

someshwar sugar factory baramati: कारखाना निवडणुकीसाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजावाजा केला नाही.

पुढारी वृत्तसेवा

Someshwar Sugar Factory Election News

सोमेश्वर : सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कृती समितीच्या पात्र उमेदवारांसह समर्थक सभासदांचा मेळावा मंगळवारी (दि. २२) निंबुत येथील बाबा-कमल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची की अन्य समविचारी गटासोबत युती करायची, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली. कारखाना निवडणुकीसाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजावाजा केला नाही.

काही जणांनी मात्र शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सभासदांच्या भावना दुखावल्याचा आरोपही काकडे यांनी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत युती करायची की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची, याबाबत कार्यकर्ते व सभासदांशी चर्चा केली जाणार आहे. कृती समितीच्या मागण्यांचा विचार न झाल्यास समविचारी व अपक्ष उमेदवारांना एकत्र करून पक्षविरहित पॅनेल उभे करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय होणार आहे, असेही काकडे यांना सांगितले.

सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत ३३०० रुपये रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरित ५०० रुपये दिवाळीत सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील. एफआरपीपेक्षा ५१५ रुपये अधिकचा देणारा सोमेश्वर कारखाना पहिलाच ठरला आहे. याशिवाय सन २०२२ मध्ये कारखाना विस्तारीकरणासाठी घेतलेले २०० रुपये व त्यावरील व्याजाची रक्कमही दिवाळीत सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

सोमेश्वर साखर कारखाना गाळपासाठी सज्ज; १४ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन

सोमेश्वरनगर: येत्या गाळप हंगामासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची तयारी पूर्ण झाली असून, कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ऊस वाहतूकदार, ऊसतोड कामगार, सभासद, अधिकारी-कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली असून, सोमेश्वरही त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या हंगामात सोमेश्वर कारखान्याकडून १३.५ ते १४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. कारखान्याकडे ३९ हजार एकर क्षेत्राची नोंदणी झाली असून, त्यामध्ये १२ लाख टन सभासदांचा ऊस आणि सुमारे दोन लाख टन गेटकेन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. दररोज नऊ हजार टनांहून अधिक क्षमतेने गाळप करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ऊस वाहतुकीसाठी ११०० बैलगाड्या, ६०० डम्पिंग ट्रॅक्टर, ३९० ट्रॅक्टर व ट्रकचे करार पूर्ण झाले आहेत. तसेच ऊसतोडणीसाठी २५ हार्वेस्टरशी करार करण्यात आला आहे. काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा पट्टापद्धतीने ऊस लागवड करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे.

दरम्यान, दसरा-दिवाळी सण तोंडावर असतानाच ऊसतोडणी व वाहतूक कराराची मुदत संपल्याने ऊसतोड कामगारांचा संप सुरू आहे. वाढीव मोबदल्याची मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याची शासनाची परवानगी असली, तरी सर्व कारखाने पूर्णक्षमतेने सुरू होण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरपासून कारखाने पूर्णक्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. ऊसतोड कामगार, मुकादम आणि साखर कारखानदार यांच्यात दर तीन वर्षांनी होणाऱ्या त्रिपक्षीय मजुरीवाढ कराराबाबत संघटना आक्रमक असतात. दुष्काळी परिस्थिती किंवा कमी ऊस उत्पादनामुळे अनेकदा कारखाने मजुरी वाढविण्यास नकार देतात, ज्यामुळे हंगाम सुरू होताना संपाची परिस्थिती निर्माण होते. सोमेश्वर कारखान्याची चालू एफआरपी १२.२७ टक्के रिकव्हरीप्रमाणे ३,४६७ रुपये प्रतिटन आहे. गत हंगामातील एफआरपी ३,२८५ रुपये होती. चालू वर्षी सोमेश्वर कारखान्याने अनुदानासह ३८००, ३९०० आणि ४००० रुपये प्रतिटन असा दर उच्चांकी दर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT