पिंपरी(पुणे) : पेट्रोल, डिझेल वाहनांना पर्याय म्हणून आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील बी. व्होक अॅटोमॅटिव्ह इलेक्ट्रॉनिक विभागात तिसर्या वर्षात शिकत असलेल्या अभिषेक मारणे या विद्यार्थ्याने सर्वसामान्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. या सायकलीच्या वापरामुळे पेट्रोल व डिझेल वाहनांमुळे होणार्या प्रदूषणावर मात करता येणार आहे. सायकल तयार करण्यासाठी त्याने सोलार संच, बॅटरी, गीयर बॉक्स, मोटार आदी साहित्यांचा वापर केला आहे.
जवळपास रुपये 7000 खर्च आला आहे. या सायकलमध्ये हेड लाईट, इलेक्ट्रिक ब्रेक्स यांचाही समावेश आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी या सायकलचा वापर करता येऊ शकतो. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांनी आपल्या संकल्पनेतून सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे.
यासाठी त्यांना विभाग प्रमुख प्रा. मनीषा निंबाळकर, शिक्षक प्रा. रचना पाटील व प्रा. विशाखा सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच बी. व्होक विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी. पी. चिमटे व महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. एम. जी. चासकर यांनी प्रोत्साहन दिले.
हेही वाचा