SNDT Women's University Pudhari
पुणे

SNDT Women's University Inquiry: एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कारभाराची चौकशी; शासनाकडून उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

विविध अनियमिततेच्या तक्रारींवर दोन महिन्यांत अहवाल; चंद्रपूर प्रकल्प, पुणे कॅम्पस आणि आयटीईपी कार्यक्रमासह अनेक मुद्द्यांची होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यापीठासंबंधी विविध बाबींच्या तक्रारीची चौकशी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार चौकशी करण्यासाठी अमोल मुत्याल, उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय यांची ‘चौकशी अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील कुलपतीद्वारे नामनिर्देशित सदस्या पौर्णिमा मेहता यांनी विद्यापीठाच्या विविध बाबींची शासनाकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर कॉम्प्लेक्ससाठी वास्तुविशारदाची नियुक्ती, पुणे कॅम्पसमधील जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये अनेक समस्या, आयटीईपी कार्यक्रमातील अनियमितता, विद्यापीठ कायदा २०१६चे उल्लंघन आदी बाबींचा समावेश आहे.

चौकशी अधिकारी यांना चौकशीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या कुलसचिवांची राहणार आहे. चौकशी अधिकारी यांना चौकशीच्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी, स्टेशनरी तसेच इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण, मुंबई यांच्याकडे देण्यात आली आहे.

तसेच चौकशी अधिकाऱ्यांनी शिफारसींसह आपला आहवाल दोन महिन्यांत शासनास सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत संबंधित विद्यापीठातील विविध अनियमितता बाहेर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT